मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 27 उमेदवारांचा समावेश आहे. यांत माहिममधून संदीप देशपांडे, बेलापूरमधून गजानन काळे, ठाण्यातून अविनाश जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर केली होती. ते सिंदखेडयातून लढत देणार आहेत.
मनसे निवडणूक लढणार का याबाबत साशंकता होती. अखेर मनसेने निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली आहे. त्यामुळे मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. राज ठाकरे यांचा तोफखाना व कार्यकर्त्यांमधील उत्साह यांमुळे निवडणुकीत चांगलाच रंग भरणार असल्याचे दिसत आहे.
मनसेच्या उमेदवारांची नावे
कल्याण – ग्रामीण राजू पाटील
कल्याण पश्चिम – प्रकाश भोईर
नाशिक पूर्व – अशोक मुर्तडक
माहीम – संदीप देशपांडे
हडपसर – वसंत मोरे
कोथरूड – किशोर शिंदे
नाशिक मध्य – नितीन भोसले
वणी – राजू उंबरकर
ठाणे – अविनाश जाधव
मागाठाणे – नयन कदम
कसबा पेठ – अजय शिंदे
सिंदखेडा – नरेंद्र पाटील
नाशिक पश्चिम – दिलीप दातार
इगतपुरी – योगेश शेवरे
चेंबूर – कर्णबाळा डुनबळे
कलिना – संजय तुर्डे
शिवाजी नगर – सुहास निम्हण
बेलापूर – गजानन काळे
हिंगणघाट – अतुल वंदिले
तुळजापूर – प्रशांत नवगिरे
दहिसर – राजेश वेरुनकर
दिंडोशी – अरुण सुर्वे
कांदिवली पूर्व – हेमंत कांबळे
गोरेगाव – वीरेंद्र जाधव
वर्सोवा – संदेश देसाई
वांद्रे पूर्व – अखिल चित्रे